आमदार चषक राज्यस्तरीय 20-20 चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 20-20 आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

नगर - वाडियापार्क येथे 2 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 20-20 आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 2 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता वाडियापार्क येथे मा.आ.अरुण काका जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.अशी माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडळ व प्रा. माणिकराव विधाते यांनी दिली आहे.


         नगर जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय 20-20 आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेमधून अनेक क्रिकेट खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव देता येणार आहे. राज्यभरातील उत्कृष्ट क्रिकेटर या स्पर्धेमध्ये सामील होणार आहे. राज्यभरातील सुमारे 32 संघ सहभागी होणार असल्याची माहिती सचिव श्री.गणेश गोंडाळ व प्रा.माणिकराव विधाते यांनी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post