चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

 चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊलपुणे- चप्पल चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने 17  वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंढव्यातील मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णांनाग्र येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी घर मालकिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पायल बाबू चव्हाण (वय 17) हे अल्पवयीन तरुणीचे नाव आहे.मृत पायल मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामगार काम करत होती. काही दिवसांपूर्वी पल्लवी अग्रवाल हिने पायलवर पर्स वचप्पल चोरीचा आळ घेतला. एवढ्यावरच न थांबता याबाबत तिला अत्यंतअपमानकारक वागणूक देत तिला त्रास दिला. चोरीचा खोटा आळ आल्याने पायल नैराश्यात गेली. तिला चोरीचा खोटा आरोप सहन न झाल्याने , पायलने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.  याबाबत पायलची आईने कोंढवा पोलीस स्थानकात घर मालकीण पल्लवी अग्रवाल हिच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पल्लवी रितेश अग्रवाल (वय 40 या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post