राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? राज्यातील 10 मंत्र्यांसह 20 आमदार कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती

 राज्यातील 10 मंत्र्यांसह 20 आमदार कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहितीकोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली माहिती अजूनच धक्कादायक आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील 10 मंत्री  20 आमदार कोरोना बाधितअजित पवार यांनी म्हटलं आहे की, राज्यात जर कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर निर्बंध वाढवावे लागतील. मुख्यमंत्र्यांची टास्कफोर्ससोबत बैठक झाली. दररोजचा आकडा लक्षात घेऊन कितीपटीत रुग्ण वाढत आहेत, ते पाहून निर्णय घेतला जाईल. जर रुग्णसंख्या वाढत असेल तर नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post