माझ्या जीवनात मी पहिल्यांदा, सगळ्यात उत्तम जेवण जेवलेय

 

माझ्या जीवनात मी पहिल्यांदा, सगळ्यात उत्तम जेवण जेवलेयबीड : आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे पंकजा मुंडे थेट ऊसतोड मजुरांच्या पालावर गेल्या. त्यांनी ऊसतोड मजूर महिलांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पंगतीला जेवणही केले. यावेळी त्या म्हणाल्या, आजपर्यंतच्या माझ्या जीवनात मी पहिल्यांदा, सगळ्यात उत्तम जेवण जेवलेय. माझ्यासाठी महिलांनी आज खूप चांगलं जेवण बनवलं होतं. त्यांच्या खुप समस्या आहेत. धान्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे मी ऊसतोड कामगारांवर एक ड्राफ्ट तयार करून मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे. अशी भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त थेट ऊसाच्या फडातून व्यक्त केलीय. ऊसतोड मजुरांच्या वाट्याला आलेली शिळी अर्धी भाकरी मी खाल्ली आहे. ऊसतोड मजुरांच्या समस्या आणि प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या सुख दुःखात मी सोबत आहे. राजकारणात फक्त गाजावाजा होतो. कोणताही सण-समारंभ दिवस, वाढदिवस त्याचा राजकारणी तमाशा करून ठेवतो. अशी खंत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post