मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपतीला पायी यात्रा करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा मृत्यू

 मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपतीला पायी यात्रा करणाऱ्या शिवसैनिकाचा मृत्यू बीडः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेदरम्यान या शिवसैनिकाचे निधन झाले आहे.  

मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नोव्हेंबर महिन्यात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांवर फिजिओथेरपीदेखील सुरू झाली होती.  मुख्यमंत्र्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी देवाकडे प्रार्थना केली होती.  बीड येथेही मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी एका शिवसैनिकांने बीड ते तिरुपती पायी पदयात्रा काढली होती. सुमंत रूईकर असे या शिवसैनिकाचे नाव असून ते बीड शहरातील माजी नगरसेवक आहेत.   ही पदयात्रा कर्नाटकमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजी अशी पायी यात्रा पूर्ण केली होती. त्यांच्या या निष्ठेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कौतुक केले होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post