पोलिसांची स्पा सेंटरवर कारवाई, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांची स्पा सेंटरवर कारवाई, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.   उस्मानपुरा परिसरातील   सिटी चॉईस स्पामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्याला याबद्दल माहिती मिळाली होती की, सिटी चॉईस स्पामध्ये महिलांकडून देहविक्री करून घेत आहेत. 

या माहितीच्या आधारे उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने या स्पा सेंटरमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एक महिलेला तर एका एजंटला पोलिसांनी  ताब्यात घेऊन, कुंटणखान्यातून 2 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. महिला आणि एजेंट विरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पिटा) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post