दिलासादायक...करोनाचा नवा अवतार 'ओमायक्रॉन' तितका Singapore Health Ministry) नाही...


दिलासादायक...करोनाचा नवा अवतार ओमायक्रॉन तितका नाही... जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं  दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरिएंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरिएंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post