नगर जिल्ह्यातील शाळेत आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा...

 


नगर जिल्ह्यातील शाळेत आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा...नगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी केलेल्या चाचणीमध्ये याच विद्यालयातील आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पारनेरचे तहसीलदार आवळकंठे यांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हेही रविवारी दुपारी नवोदय विद्यालय परिसराची पाहणी करणार आहेत.  नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोनासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर शुक्रवारी काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता दहा विद्यार्थी व एक संगीत शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे बाधित विद्यार्थी व शिक्षक यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहे. प्रशासनाने माहिती दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांपैकी शुक्रवारी 27 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव आली तर शनिवारी  आणखी 25 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.  पहिल्या दिवशी 19 आणि रविवारी मिळालेल्या अहवालात 52 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या 71 इतकी झाली आहे.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post