मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये दाखल...उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्वागत

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या अखेर राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये दाखल...उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्वागत

 


मुंबई: मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपालीताई पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रुपालीताई डॅशिंग आणि आक्रमक नेत्या आहेत. पण आज त्यांच्यासह फक्त दहा महिलांनाच आज पक्षात प्रवेश दिला आहे. पुढील काळात पुण्यात मोठा मेळावा घेऊन इतरांनाही पक्षात प्रवेश दिला जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

\


अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रुपालीताई पाटील ठोंबरे या आक्रमक नेत्या आहेत. त्यांनीही पक्षात प्रवेश केला. त्या मनसेत अतिशय चांगलं काम करत होत्या. आज त्यांच्यासह दहा महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला. मी पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. पुण्यात मोठा मेळावा घेऊ. त्यावेळी इतरांनाही पक्षात प्रवेश देऊ, असं अजितदादा म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post