विधानसभा निवडणूक लढवायची तयारी केली होती...पण एका घटनेने दिशा बदलली....पद्मश्री पोपटराव पवार यांची ‘मनकी बात’

 विधानसभा निवडणूक लढवायची तयारी केली होती...पण एका घटनेने दिशा बदलली....पद्मश्री पोपटराव पवार यांची ‘मनकी बात’नगर : माझा पद्‌‌‌मश्री पुरस्कार हा फक्त हिवरेबाजारचा नाही तर जिल्हा परिषदेचाही आहे. मी 1996 ला राजकारणाऐवजी गावात काम करण्याचे ठरवले. नंदकुमार झावरे आमदार होते. ते कर्डिले, कापरे माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की लोणीला तत्कालिन खासदार बाळासाहेब विखे यांनी बोलवले आहे. तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे. अनेक नेते आले मला विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितली. मात्र गावात एक घटना घडली व मी ठरवले की पक्षीय राजकारण करायचे नाही. आपले काम गावातच करायच. राजकारण वाईट नसते. राज्यकर्ते, प्रशासनाच्या योगदानामुळेच देश अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत, असा मोठा खुलासा पद्मश्री पोपटराव पवार यांनी केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनिमित्त हिवरेबाजार येथे पद्मश्री पुरस्काराबद्दल पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पवार यांनी आपल्या वाटचालीचा पट उलगडून सांगताना कटाक्षाने राजकारणाबाहेर राहून काम करण्यावर भर दिला आहे. ते पुढे म्हणाले की, हिवरेबाजारचे यश हे सगळ्यांचे यश आहे. विकासात सातत्य ठेवले. त्यामुळे देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post