जि.प.कर्मचारी सोसायटी निवडणुकीसाठी श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

 


जि.प.कर्मचारी सोसायटी निवडणुकीसाठी श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभनगर : अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदा परिवर्तनाचा नारा देत श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनल रिंगणात उतरले आहे. अर्ज माघारीची मुदत संपताच या पॅनलने सोसायटीच्या आवारातील गणेश मंदिरात आरती करून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी पॅनलचे नेते व उमेदवार सुभाष कराळे, मनोहर डिसले, विकास साळुंके, डॉ.सुरेश ढवळे, बाळासाहेब यादव, विलास वाळूंज, सोपान हरदास, वंदना धनवटे, संतोष कोळगे, किरण खेसम्हाळसकर, रमेश जावळे, अशोक लिंगडे, गितांजली कोरडे, महेंद्र आंधळे, रमेश औटी, नारायण बोराडे, शिवाजी भिटे, शशिकांत रासकर, आशा घोडके, विद्या निराळी, एम.पी.कचरे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुभाष कराळे म्हणाले की, पॅनलने सर्व 21 जागांवर उमेदवार दिले आहेत. 2004 पासून पॅनलची सत्ता असताना सोसायटीत उत्कृष्ट काम करून दाखवले आहे. सभासद हित, संस्थेचे हित जोपासत पॅनल निवडताना सर्व संवर्गांना समावून घेण्यात आले आहे. मागील काळात सोसायटीचा कारभार पाहता सभासद यावेळी परिवर्तन घडवून पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलचा झेंडा सोसायटीवर फडकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post