केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या प्रवरानगरमधील सहकार परिषदेवर मंत्री हसन मुश्रीफ यांची टिका...म्हणाले...

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या प्रवरानगरमधील सहकार परिषदेवर मंत्री हसन मुश्रीफ यांची टिका...म्हणाले... नगर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सहकार परिषद झाली. मात्र या सहकार परिषदेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. नगर पंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ   शनिवारी  नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ  यांनी सहकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली.  

हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर   येथे झालेली सहकार परिषद ही भारतीय जनता पक्षाची सहकार परिषद आहे. सहकार हा प्रामुख्याने राज्य सरकारचा विषय आहे. केंद्राचा सहकार हा मल्टिस्टेट संस्थांना लागू होतो. मल्टिस्टेटचा कायदा जाचक आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेविरोधी आहे. आम्हाला या सहकार परिषदेला बोलाविले असते, तर मल्टिस्टेट कायद्यातील जाचक अटींबद्दल केंद्रीय सहकारमंत्र्यांना सांगितले असते, अशी खोचक टीका मुश्रीफ यांनी केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post