विलास पाटलांची कमाल, दोन्ही पत्नी बनल्या ग्रामपंचायतीच्या मेंबर

विलास पाटलांची कमाल, दोन्ही पत्नी बनल्या ग्रामपंचायतीच्या मेंबर  जळगाव - पाचोरा तालुक्यातील पहाण या गावात  विलास पाटील यांनी दोन महिलांसोबत विवाह केला आहे. विलास पाटील यांनी त्यांच्या दोन्ही पत्नींना ग्रामपंचायतीवर निवडून आणलं आहे. एका पत्नीला सार्वत्रिक निवडणुकीत तर दुसऱ्या पत्नीला पोटनिवडणुकीत विजयी करण्यात विलास पाटील यांना यश आलं आहे. विलास पाटील यांच्या करिष्म्याची चर्चा जळगावात सुरु आहे.


पाचोरा तालुक्यातील पहाण ग्रामपंचायत गावातील एका माणसानं जणू काही स्वप्नचं सत्यात उतरवलं आहे. पहार गावातल्या एका पतीने आपल्या पहिल्या पत्नीला सार्वत्रिक निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य केलं. काही काळानंतर एका ग्रामंपचायत सदस्याचं निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणुकीची आलेली संधी पाहता एका बलाढ्य विरोधका समोर आपल्या दुसऱ्या पत्नीला उमेदवारी दिली. विलास पाटील आणि त्यांच्या पत्नींनी कार्यकर्त्यांसह कष्ट करत विजय मिळवला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post