पोलीस अधिकाऱ्यांसह मंत्री जयंत पाटील यांच्याकडून माझ्या हत्येचा कट , गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप...video

 पोलीस अधिकाऱ्यांसह मंत्री जयंत पाटील यांच्याकडून माझ्या हत्येचा कट , गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप...video मुंबई: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तो हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

vdo0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post