ओमायक्रॉन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, राज्यात 23 नवे रुग्ण, 2 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, राज्यात 23 नवे रुग्ण,  2 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह


 

उस्मानाबाद : कोरोना व्हायरसचा   ओमायक्रॉन  या व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात  या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुन्हा एकदा उस्मानाबाद जिल्ह्यात  ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आता तब्बल 23 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 22 डिसेंबर या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात   एकही रुग्ण आढळला नव्हता.


उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या 5 रुग्णांपैकी 1 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमायक्रॉनचे आणखी 2 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ओमायक्रॉनचे 5 रुग्ण झालेत.

 मोहा येथील 31 वर्षीय पिता आणि त्यांच्या 2 वर्षीय मुलाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोहा येथील व्यक्ती घाना देशातून आली होती. त्यांना आणि त्यांच्या 2 वर्षीय मुलाला या अगोदर कोरोनाची लागण झाली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post