मंत्री, आमदार, ठेकेदार, जिल्हाधिकारी दारूचे सेवन करतात, दारू पिणे चुकीचे नाही...माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

 

मंत्री, आमदार, ठेकेदार, जिल्हाधिकारी दारूचे सेवन करतात,  दारू पिणे चुकीचे नाही...माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यपाटणा : बिहारमधील दारूबंदीचा  मुद्दा मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत राहिला आहे. आता बिहारचे माजी मुख्यमंत्री व हम पक्षाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी थेट नीतिश कुमार  सरकारला घरचा आहेर देत नागिरकांना अजब सल्ला दिला. जिल्हा अधिक्षक, जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री हे सगळेच दारू पितात. पण त्यांना अटक केली जात नाही. औषध म्हणून थोडी दारू पिणे चुकीचे नाही, असं वक्तव्य मांझी यांनी केलं आहे.

मांझी यांनी एका कार्यक्रमाती भाषणात नागरिकांनाही दारू पिण्याचा सल्ला दिला आहे. दारूबंदीच्या धोरणावरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांसह मंत्री, आमदार, ठेकेदार, जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक रात्री दहा वाजल्यानंतर दारूचे सेवन करतात. त्यांना अटक केली जात नाही. पण दारूबंदी कायद्याच्या नावाखाली गरीब, दिलतांना पकडून तुरुंगात टाकले जाते, हे चुकीचे आहे.


मी लहान असताना माझ्या घरीही दारू तयार केली जात होती. माझी आई आणि वडील दारू बनवत असत. पण मी शिक्षण घेतल्यानंतर हे काम बंद केले. आमच्या सभ्यतेतच दारू आहे, त्याला हटवले जाऊ शकत नाही, असेही मांझी यांनी नमूद केलं. यावेळी व्यासपीठावर बिहारचे मंत्रीही उपस्थित होते.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post