मुख्याध्यापकाशी वाद....शिक्षिकेने शाळेच्या आवारातचं प्राशन केलं विष....

मुख्याध्यापकाशी वाद....शिक्षिकेने शाळेच्या आवारात प्राशन केलं विष.... बीड -  जिल्ह्याच्या माजलगाव  याठिकाणी एका शिक्षिकेनं शाळेच्या आवारातचं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न  केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकासोबत वाद झाल्यानंतर, संबंधित शिक्षिकेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, शाळेत एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षिकेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

संगीता राठोड असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. त्या माजलगावजवळील राजेवाडी येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांच्यासोबत वाद सुरू आहे. यापूर्वी देखील त्यांच्यात अनेकदा वाद झाला आहे. गावकऱ्यांनी मध्यस्थी करत त्यांच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्यातील हा वाद सुरूच होता. 

 मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या वादाला वैतागलेल्या गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्य गेटलाच कुलूप लावलं. तसेच दोघांपैकी एकाची बदली झाल्याशिवाय शाळेचं कुलूप उघडलं जाणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोघांना चौकशीसाठी सोमवारी पाचारण केलं होतं. तत्पूर्वी शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास शिक्षिकेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post