शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच हल्ला केला, रोहिणी खडसे यांनी केला आरोप

शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच हल्ला केला, रोहिणी खडसे यांनी केला आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. मला घाबरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. मात्र, मी घाबरणार नाही असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. 

रोहिणी खडसे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी एकनाथ खडसेदेखील उपस्थित होते. रोहिणी खडसे यांनी सांगितले की, तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले.  एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आले होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. हल्ला करणाऱ्यांमध्ये शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील,  पंकज कोळी व छोटू भोई यांचा समावेश असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. 
हा हल्ला मला घाबरवण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, मी या हल्ल्याने घाबरणार नसून महिलांच्या पाठिशी कायम उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post