युवा नेते अक्षय कर्डिले यांचा 29 रोजी विवाह सोहळा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांना आग्रहाचे निमंत्रण

युवा नेते अक्षय कर्डिले यांचा 29 रोजी विवाह सोहळा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांना आग्रहाचे निमंत्रण नगर : नगर जिल्ह्यातील भाजपचे  ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले  यांचा मुलगा अक्षय कर्डिले राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी अराजकीय घरातील मुलगीची निवड केली आहे. शिवाजी कर्डिले यांचे होणारे व्याही राजेंद्र कासार हे प्रगतीशील शेतकरी असून कर्डिले समर्थक आहेत. अक्षय कर्डिले व प्रियंका कासार यांचा मागील महिन्यातच साखरपुड्याचा कार्यक्रम झाला होता. अक्षय व प्रियंका यांचा हा विवाह सोहळा 29 डिसेंबरला बुऱ्हाणनगर येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या विवाहासाठी शिवाजी कर्डिले यांनी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेता संजय दत्ता पर्यंत सर्वांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्यासाठी दिग्गज नेते नगर शहरात येणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post