विक्रम राठोड धमकी प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार- किरण काळे

 काँग्रेस धावली शिवसेनेच्या मदतीला... राठोड धमकी प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार, नगर : युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र शिवालयावरती आले होते. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देखील दाखल केली आहे. मनपा पोटनिवडणुकीतील नाट्यमय घडामोडींनंतर  शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह थेट शिवालय गाठत विक्रम राठोड यांची भेट घेवून काँग्रेस आपल्या पाठीशी असल्याचे राठोड यांना सांगितले.  धमकी पत्रात ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. बोराटे, फुलसौंदर यांच्याशी देखील दूरध्वनीद्वारे संवाद साधत काळे यांनी काँग्रेस आपल्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.


यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 


विक्रम राठोड यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगात काँग्रेसने उतराई होत राठोड यांच्या मदतीला धावून येण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी विक्रम राठोड व किरण काळे यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी काळे म्हणाले की, विक्रम राठोड हे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ते शिवसेनेचे नेते आहेत. स्व.अनिलभैया राठोड यांचे रक्त त्यांच्यामध्ये आहे. अशा गोष्टींना ते कदापि भीक घालणार नाहीत. 


किरण काळे म्हणाले की हे प्रकरण गंभीर असून याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची मी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह समक्ष भेट घेणार असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे करणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post