वर्षाच्या शेवटी सोने-चांदी झाली स्वस्त, आजचा १० ग्रॅमचा भाव

31.12.2021   १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,७५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,७५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,५६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,७५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२२ रुपये आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post