आता सोनिया गांधी, राहुल गांधी बनलेत संजय राउतांचे नेते...

 

आता सोनिया गांधी, राहुल गांधी बनलेत संजय राउतांचे नेते...औरंगाबाद  : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची  भेट घेतल्यानंतर भाजपविरोधात लढण्यासाठी यूपीए समांतर आघाडीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर  सामनाच्या संपादकीयमधून म्हटलं, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखे आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पहिल्यांदाच सांगितलं की, सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदलले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झालेले आहेत. म्हणून मला असं वाटत आहे की, तिच प्रचिती आता यातून आपल्याला मिळत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post