डान्स करण्यासाठी जबरदस्ती..बारबालेने चौथ्या मजल्यावरुन उडी घेत केली आत्महत्या!


डान्स करण्यासाठी जबरदस्ती..बारबालेने चौथ्या मजल्यावरुन उडी घेत केली आत्महत्या!दिल्ली-  दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला कर्मचाऱ्याने बिअर बारच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बारमालक बारमध्ये काम करणाऱ्या मुलीला जबरदस्तीने डान्स करायला लावत होता, त्यामुळे तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, असा आरोप आहे. राखी असे मृत झालेल्या मुलीचे नाव असून ती २१ वर्षांची होती. 

बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. जखमी राखीला तातडीने बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post