हे लोकशाहीत चालतं का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट राज्यपालांवर निशाणा

 हे लोकशाहीत चालतं का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट राज्यपालांवर निशाणा


 

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी 12 आमदारांची यादी पाठवली होती. त्याला एक वर्ष होऊन गेलं. रितसर ठराव केला. 170 सदस्यांचा पाठिंबा असलेल्या सरकारनं ही नावं पाठवली. त्यावरही अजून निर्णय झाला नाही. ते कशात बसतं. हे योग्य आहे का, हे लोकशाहीत चालतं का, असा खरमरीत सवाल विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना लोकशाहीचा धडाच सांगितला.

अजित पवार म्हणाले की, राज्यपालांचे कुठलेही अधिकार कमी केले जात नाहीत. कुलगुरूंच्या निवडीसंदर्भात जी समिती आहे. ती पाच सात जी काही नावे असतील ती सिलेक्ट करेल. जी नावे योग्यतेची वाटतील ती आल्यावर सरकार त्यातून दोन नावं राज्यपालांकडे पाठवतील. राज्यपाल त्यातून एक नाव त्याचे प्रमुख म्हणून फायनल करायचे आहे. म्हणजे सरकार पाच, सात नाव ठरवणार नाही. जी समिती आहे ती समिती ठरवणार आहे. समितीकडून सरकारकडे येणार आहेत. त्यातून दोन नावं सरकार राज्यपालांना पाठवणार आहे. त्यात कुठलं आलं राजकारण, सरकारचा हस्तक्षेप कसा येतच नाही, असा दावा त्यांनी केला. आरोप कोणीही करत आहे. बिनबुडाचे आरोप होत आहेत. काही लोकांना आरोपांशिवाय काही राहिलंच नाही. याबद्दल ते बोलतात, असा रोषही त्यांनी व्यक्त केला.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post