वर्धापन दिनी ध्वजारोहणादरम्यान ध्वजस्तंभावरून पडला काँग्रेसचा झेंडा, सोनिया गांधींनी हातात झेलला...video

वर्धापन दिनी ध्वजारोहणादरम्यान ध्वजस्तंभावरून पडला काँग्रेसचा झेंडा, 

सोनिया गांधींनी हातात झेलला

 


नवी दिल्लीः काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली.cझाले काय की, काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली खरी. मात्र, तो झेंडा त्यांच्याच हातावर येऊन पडला. तेव्हा सारेच सैरभर झाले. काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष हे ध्वजवंदन करतात. दरम्यान, आज सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी सोनिया गांधी यांनी ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला असता. हा झेंडा ध्वजस्तंभावरून खाली पडला. मात्र सोनिया गांधी यांनी हा ध्वज प्रसंगावधान राखत झेलला. हा झेंडा योग्य प्रकारे बांधला न गेल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हातातच झेंडा फडकवला.https://twitter.com/ANI/status/1475684180650442754?s=20

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post