अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ‘ईडी’च्या रडारवर, चौकशीसाठी समन्स

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ‘ईडी’च्या रडारवर, चौकशीसाठी समन्सपनामा पेपर्सशी संबंधीत चौकशीसाठी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीन समन्स बजावले आहे. यापूर्वी दोन वेळा ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण तिने चौकशीसाठी जाण्यास नकार दिला होता.


‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबीयांचे नाव समोर येताच मनी लॉड्रिंगचाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post