नगर शहरात शिवसेनेत इन्कमिंग सचिन जाधव पुन्हा स्वगृही मातोश्रीवर बांधले शिवबंधन!

 सचिन जाधव पुन्हा स्वगृही मातोश्रीवर बांधले शिवबंधन!




अहमदनगर-शिवसेने पासून दुरावलेले माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव यांची मिस्टर सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. आज मातोश्रीवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा मुंबईत आज पार पडला. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, मदन आढावा यावेळी उपस्थित होते.

हॉटेल व्यावसायिक आणि नगरच्या राजकारणात जम बसलेले सचिन जाधव १९९० मध्ये बालशिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. स्व.अनिलभैया राठोड यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक असलेले सचिन जाधव २०१३ च्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१५ मध्ये शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाची निवडणूक लढविली. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताने त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर २०१६ मध्ये शिवसेनेने  त्यांना स्थायी समिती सभापती पदाची संधी दिली. या कार्यकाळात त्यांनी शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली. २०१८ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेची साथ सोडत बहुजन समाज पार्टी कडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत पत्नी अश्विनी यांच्यासह चारही नगरसेवक त्यांनी निवडून आणत आपली राजकीय ताकत दाखवून दिली.



सचिन जाधव स्व. अनिल राठोड यांचे खंदे समर्थक असले तरी त्यांचे मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. शंकराव गडाख यांच्या पुढाकारातून सचिन जाधव आज पुन्हा स्वगृही परतले. युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांनी गत आठवड्यातच शिवसेना सोडून गेलेल्यांची घरवापसी होणार असल्याचे सुतोवाच केले होते, त्याची सुरुवात आज सचिन जाधव यांच्या पासून झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post