नगर जिल्ह्यात बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

 नगर जिल्ह्यात बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाणअहमदनगर : कॉलेजमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला बागेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन जण फरार आहेत मारहाण करण्यात आलेला तरुण घुगल वडगाव येथील रहिवासी असून श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकतो. या युवकाचा 27 नोव्हेंबर 2021 रोजी बाकावर बसण्याच्या किरकोळ कारणावरून वर्गातल्या इतर दोन विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. सदर वाद आपापसात मिटलाही होता. मात्र 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर सिद्धार्थनगर येथील दोन युवक आले आणि सदर युवकाला ‘तुझ्याकडे काम आहे, आपण पेट्रोल पंपावर जाऊ’ असे सांगून त्याच्याकडे असलेल्या मोपेड गाडीवर बसून तिघे जण गेले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post