पारनेर मध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेत थेट सामना.... माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नीच्या प्रभागात रंगतदार लढत


पारनेर मध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेत थेट सामना.... माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नींच्या प्रभागात रंगतदार लढत नगर : पारनेर नगरपंचायत निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता लढती स्पष्ट झाल्या आहेत. 17 पैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून एकही जागा बिनविरोध नाही. भाजप व काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवित आहे. त्यामुळे नगर पंचायतीत माजी आमदार विजय औटी  यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना  उमेदवार विरूद्ध आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस  उमेदवार अशी सरळ लढत होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी प्रभाग 9मधून निवडणूक लढवित आहेत. या प्रभागात शिवसेनेच्या जयश्री औटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिमानी नगरे अशी सरळ लढत होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपने प्रभाग पाच बाय दिला आहे. त्यामुळे या प्रभागात शहर विकास आघाडीचे चंद्रकांत चेडे विरूद्ध अपक्ष उमेदवार नितीन अडसुळ अशी लढत होईल. शहर विकास आघाडीने 10 प्रभागांत उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी 12 जागांवर उमेदवार दिले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post