बोगस लस प्रमाणपत्र देणारे सरकारी डॉक्टर व नर्सच्या टोळीचा पर्दाफाश!

औरंगाबादेत बोगस लस प्रमाणपत्र देणारे सरकारी डॉक्टर व नर्सच्या टोळीचा पर्दाफाश!औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी  लसीकरणासाठी  सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा परिणाम म्हणून शहरात बनावट कोरोना लस देणारी टोळी सक्रीय झाली. जिन्सी पोलीसांनी 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन हा या टोळीचा मास्टरमाइंड होता, असेही समोर आले आहे.कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासकांमार्फत युद्ध पातळीवर मोहीम राबवली जात असतानाच मंगळवारी लसीकरणातील ही बोगसगिरी समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांना अटक करण्यात आली. तर सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदीवरून बनावट प्रमाणपत्र तयार करत होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post