नगर जिल्ह्यात प्रांत कार्यालयाबाहेर रिव्हॉल्वर मधून गोळीबार, देवस्थान जमीन वाद

नगर जिल्ह्यात प्रांत कार्यालयाबाहेर रिव्हॉल्वर मधून गोळीबार, देवस्थान जमीन वाद कर्जत- देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर संदीप छगन मांडगे याने रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या संदीप मांडगे यास अटक केली.


याबाबत भरत नामदेव मांडगे (वय 45, धंदा शेती, रा. रेहकुरी, ता. कर्जत) याने कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमीन गट नं. 70.71,72,73 मध्ये एकूण 75 एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र अनेक वर्षांपासून आमच्या भावकीतील चार कुटुंबे ही शेत जमीन करीत होते. कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो. परंतु आमच्या भावकीतील संदीप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याच्या घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदीप छगन मांडगे याने इतर दुस-या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून मला व आमचे भावकीतील लोकांना काल दि.30 डिसेंबर रोजी उप विभागीय दंडाधिकारी कर्जत येथे तारीख असल्याने मी व आमच्या भावकीतील बरीच मंडळी तारखेस आली होती. सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील उप विभागीय दंडाधिकारी कर्जत विभाग येथील गेटजवळ थांबलो असताना त्यावेळी संदीप मांडगे, सचिन मांडगे तेथे आले. त्यावेळी माझा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटरसायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने मी सदर मोटरसायकल घेवून घरी निघालो होतो. त्याचवेळी मला संदीप छगन मांडगे याने, तू मोटरसायकल घेवून जावू नको, खाली उतर असे म्हणून शिवीगाळ केली आणि दमदाटी करून मारहाण केली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाली. या दरम्यान संदीप मांडगे याने त्याच्या कंबरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला. त्यानतंर संदीप मांडगे हा तेथून निघून गेला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post