माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सुनेची पोलिसांत धाव.... कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

 

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सुनेची पोलिसांत धाव.... कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारनाशिक : माजी  मंत्री मधुकर पिचड   आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती.

मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कलम 498, 306, 406, 324, 504, 506, 468, 471 अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस मधुकर पिचड यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post