पद्मश्री पोपटराव पवार यांचा बनपिंप्री येथे सत्कार

 पद्मश्री पोपटराव पवार यांचा बनपिंप्री येथे सत्कारनगर: पद्मश्री पोपटराव पवार ( सरपंच आदर्श गाव हिवरे बाजार ) यांना ग्रामविकास व जलसंधारण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पद्मश्री पोपटराव पवार यांचा बनपिंप्री येथे समस्त ग्रामस्थ व जगताप कुटुंबाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

या भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन मा.सचिनभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

याप्रसंगी आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्यामअण्णा शेलार, माजी आमदार राहुल जगताप तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post