कर्जतमध्ये राजकारण तापलं...भाजपचे पोटरे आ.पवारांना म्हणतात...‘दादा हे वागणं हे बरं नव्हं!’


कर्जतमध्ये राजकारण तापलं...भाजपचे पोटरे आ.पवारांना म्हणतात...‘दादा हे वागणं हे बरं नव्हं!’नगर (सचिन कलमदाणे) : कर्जत नगरपंचायत निवडणुकीवरुन राजकारण तापलं असून माजी मंत्री राम शिंदे हे गोदड महाराज मंदिराबाहेर मौन आंदोलनास बसलेले असताना आ.रोहित पवार यांनी समर्थकांसह येवून मंदिरात दर्शन घेतलं. मंदिरातून परत जातानाही त्यांनी शिंदेंशी संवाद साधण्याचे टाळलं. आ.रोहित पवार यांच्या या कृतीचा भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून समाचार घेतलाय. 
पोटरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की,#दादा_हे_वागणं_बरं_नव्ह - कर्जत नगरपंचायत च्या निवडणुकीत प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही विरोधात लोकशाही पद्धतीने न्याय मिळाला नाही म्हणून सद्गुरू गोदड महाराजांच्या मंदिरासमोर माजी मंत्री श्री. राम शिंदे यांनी मौन धरून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पदाधिकारी सहित बसले असता व मुकमोर्चा च्या नियोजनासाठी असंख्य कार्यकर्ते जमा होत असतानाच आमदार श्री.रोहित दादा पवार यांनी निवडक कार्यकर्त्याना घेऊन मंदिरात दर्शनासाठी येणे किती संयुक्तिक होतं...? आपली सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने झळकायची सवय आम्हाला माहीत आहे परंतु या ठिकाणी पत्रकार असणार हे तुम्हाला माहित होतं त्यात तुम्ही तुमचे फोटोग्राफर घेऊन तेथे येणे , त्यात मंदिरात गेल्यावर घोषणा देणे , आणि एव्हढ्या चिघळलेल्या परिस्थितीत ही या मंदिराच्या भेटीचे फोटो आशा पद्धतीने व्हायरल करणे हे सद्गुरू श्री.गोदड महाराजांना ही मान्य होणार नाही आणि कर्जत च्या जनतेला ही मान्य होणार नाही...! #मंदिरात_भक्त_येतात_वाघ_नाही कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ शकतो आशा प्रसंगात एका विध्यमान आमदारांनी केलेला हा स्टंट नक्कीच त्यांची अपरिपक्वताच दाखवत आहे आणि #प्रशासन काय करतंय..? हा प्रश्न तर अजूनही अनुउत्तरीत आहेच...? #कर्जतकरांनो_जागे_व्हा...!!! #सद्गुरु_सारखा_असता_पाठीराखा_इतरांचा_लेखा_कोण_करी.
सचिन पोटरे- जिल्हा सरचिटणीस भाजपा अहमदनगर ( द )

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post