सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे भाव

 सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे भावनवी दिल्ली :  आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात 0.17  टक्क्यांनी घसरण झाली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 47,832 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरामध्ये देखील 0.14 टक्क्यांची घट झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 61,192 वर पोहोचले आहेत. सोने आणि चांदीच्या दरामध्ये अनुक्रमे 82 आणि 78 रुपयांची घट झाली आहे.

दरम्यान आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मौल्यवान धातुचे दर वधारले होते. मात्र त्यानंतर आज त्यामध्ये घट झाल्याची पहायला मिळत आहे. सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर चांदीच्या दरात 0.27 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे सोने 48000 हजारांवर पोहोचले होते. आज त्यामध्ये घट होऊन, सोन्याचे दर 47,832 पर्यंत खाली आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post