दबंगगिरी... शिवसेना मंत्र्याच्या भावाची तक्रारदाराला मारहाण, गुन्हा दाखल

 

दबंगगिरी... शिवसेना मंत्र्याच्या भावाची तक्रारदाराला मारहाण, गुन्हा दाखलऔरंगाबाद : शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाने कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. रस्त्याच्या कामाची तक्रार केल्याने मारहाण करण्यात आली. रणजित नरवडे असे या मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांच्यासह आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


रणजित नरवडे यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. 2018 मध्ये रस्त्याचे काम न करताच बोगस बिल उचलल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. तक्रार केल्यानंतर घाईगडबडीने कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र याचा राग मनात धरून, संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू  भुमरे यांनी आपल्याला लाथा, बुक्क्याने मारहाण केली, अशी तक्रार नरवडे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post