१ जानेवारी २०२२ पासून महागाईचा मोठा फटका....कपडे, शूज, चप्पल...

 १ जानेवारी २०२२ पासून महागाईचा मोठा फटका....कपडे, शूज, चप्पल... पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. कपडे, शूज, चप्पल खरेदी करणे आणि ऑनलाइन अन्न ऑर्डर करणे खूप महाग होणार आहे. १ जानेवारीपासून तयार कपड्यांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे रेडिमेड कपड्यांच्या किमतीही वाढतील. 


सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध होत असला तरी सरकार आपल्या निर्णयापासून मागे हटण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे नवीन वर्षापासून तयार कपडे घेण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने कपडे आणि शूज यांसारख्या तयार वस्तूंवर गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. या कर स्लॅबमधील नवीन बदल १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post