कारमधून अवैधरित्या गुटखा, पानमसाला वाहतूक, पोलिस कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त

 *स्विफ्ट कार मध्ये हिरा गुटका पान मसाला, विमल पान मसाला, तंबाखु महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला २ लाख ३५ हजार १४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

एक आरोपी ताब्यात

श्रीगोंदा पोलिसांची कारवाईनगर (विक्रम बनकर) : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बंदी असलेला हिरा पान मसाला तंबाखू पान मसाला विक्री होत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना माहीती मिळाली की, तेजस दादासाहेब ढमे, (राहणार श्रीगोंदा फॅक्टरी, तालुका श्रीगोंदा) हा ढोकराई फाटा ते श्रीगोंदा रोडवर, प्राथमिक शाळे समोर, श्रीगोंदा फॕक्टरी, तालुका श्रीगोंदा येथे त्याच्या मालकीच्या स्विफ्ट कारमध्ये गोण्यांमध्ये भरुन ठेवलेला महाराष्ट्र शासनाने बंदी केलेले सुगंधी पान मसाले, तंबाखु , हिरा वगैरे विक्री करण्याचे ऊद्देशाने स्व:ताचे कब्जात बाळगुन त्याची चोरुन विना परवाना बेकायदा विक्री करत आहे. अशी खात्रीशीर माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाईचा आदेश दिल्याने पोलीस कॉन्स्टेबल सचिन म्हस्के, पोलीस नाईक एस.एस.फलके, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अजबे , पोलीस कॉन्स्टेबल अमोल शिंदे आदी कर्मचाऱ्यांचे पथक सरकारी वाहनाने तेथे रवाना झाले असता नमुद ठिकाणी श्रीगोंदा फैक्टरी, तालुका श्रीगोंदा येथे ७ वा.२० वा . अचानक छापा टाकला असता एक इसम त्याचे किराणा दुकाना समोर निळ्या रंगाचे स्विफ्ट कार नं एम एच 12 ET 2137 मध्ये पांढ-या रंगाच्या गोण्यामध्ये कशाच्या तरी पुड्या ठेवत असताना दिसला त्यावेळी सदर इसमास जागीच ताब्यात घेवून त्यास पोलीस स्टाफची ओळख करून देवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तेजस दादासाहेब ढमे, वय २० वर्ष, राहणार श्रीगोंदा फैक्टरी, तालुका श्रीगोंदा असे सांगितले. पोलीस स्टाफने स्विफ्ट कारची झडती घेतली असता तेथे पांढ-या गोण्यांमध्ये काहीतरी ठेवलेले दिसले तेंव्हा सदर प्लास्टीकचे गोण्यांमध्ये काय ठेवले आहे त्या बाबत त्यास विचारणा केली असता त्याने सदर गोण्यांमध्ये गुटखा, सुगंधी तंबाखु पान मसला असल्याचे सांगितले व सदर माल विक्री करण्यासाठी ठेवला असल्याचे सांगितले. सदर गोण्यांची  पाहणी केली असता खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ साठा आढळुन आला त्याची स्विफ्ट कार सह एकुण २ लाख ३५ हजार १४८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिरा पान मसाला, विमल पान मसाला, तंबाखु महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला नाश कारक तंबाखु व पान मसाला हा इसम नामे तेजस दादासाहेब ढमे, (वय २० वर्ष, राहणार श्रीगोंदा फॅक्टरी, तालुका श्रीगोंदा) हा त्याचे ताब्यातील निळया रंगाचे सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार नं MH 12 ET 2136 मध्ये अन्न पदार्थ हे मानवी आरोग्यास हानीकारक आहे याची जाणीव असताना विक्री करण्याचे ऊद्देशाने वाहतुक करताना व जवळ बाळगताना मिळुन आला आहे. पोना फलके यांनी मिळालेल्या मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करुन आरोपी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला. तेजस दादासाहेब ढमे याचे विरुद्ध भा.द.वि.क. 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 59,26 ( 2 ) ( IV ) प्रमाणे कायदेशीर पोलीस कॉन्स्टेबल सचिन मस्के यांनी फिर्याद आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन  म्हस्के, पोलीस नाईक एस.एस.फलके, पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे , पोलीस कॉन्स्टेबल अमोल शिंदे अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post