रिक्षाचालकाचा मुलगा आरोग्य विभागाच्या परीक्षेत राज्यात प्रथम

 आरोग्य विभागाच्या परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल ओंकार मते याचा सत्कार


रिक्षाचालकाचा मुलगा आरोग्य विभागाच्या परीक्षेत राज्यात प्रथम नगर - विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यासासाठी परिश्रम घेतल्यास यश निश्चीत मिळते. त्यामुळे शालेय जीवनात पुढील करीयरचा विचार करून नियोजन केल्यास यशस्वी जीवनाची पायाभरणी होते.रिक्षाचालक प्रशांत मते यांचा मुलगा ओंकार मते याने प्रतिकुल परिस्थीतीत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या परफ्यूजनिस्ट पदाच्या परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवल्याबद्दल त्याचा सहपरिवार सत्कार आ संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.रिक्षाचालकाच्या मुलाने कठोर परिश्रम घेऊन राज्यस्तरीय परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवणे ही बाब गौरवास्पद असून यामुळे आई वडीलांच्या श्रमांचे देखील सार्थक होत असते, असेही आ जगताप यावेळी म्हणाले.या सत्कार प्रसंगी प्रशांत मते, माधूरी मते, अभय ललवाणी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post