मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची मतदान केंद्रे वाढवावी- सहकार पॅनलची मागणी


मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची मतदान केंद्रे वाढवावी- सहकार पॅनलची मागणी

कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी - बाबासाहेब मुदगलअहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूकिचे मतदान 18 डिसेंबर रोजी होत असून कोविड-19, ओमायक्रोनच्या प्रादुर्भावामुळे मतदान केंद्रावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी जास्तीत-जास्त मतदान केंद्रे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सहकार पॅनेलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
        18 डिसेंबर रोजी मनपा पतसंस्थेची निवडणूक होत असून,सर्व सभासद हे मनपाचे कर्मचारी आहेत त्यांना संपूर्ण शहरांमध्ये शहरवासीयांचे आरोग्य,पाणीपुरवठा,आरोग्य सेवा अशा अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम ते करतात मतदान करण्यासाठी एका सभासदाला किमान तीन मिनिटांचा अवधी लागणार असून, एका तासामध्ये एका बूथ मध्ये किमान अंदाजे वीस मतदारांचे मतदान होऊ शकते त्या अनुषंगाने एका बूथ मध्ये आठ तासात 120 सभासदांचे मतदान होऊ शकते तरी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पतसंस्थेचे एकूण 1229 मतदार असून त्यांना वरील वेळेनुसार लागणारा वेळ व शहरवासीयांच्या व सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये ही बाब लक्षात घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रे वाढवावी अशी मागणी सहकार पॅनेलच्या वतीने बाबासाहेब मुदगल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post