सुमंत रूईकर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना उचलणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा

  सुमंत रूईकर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना उचलणार, एकनाथ शिंदे यांची घोषणामुंबई: शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक सुमंत रुईकर  यांच्या कुटंबाची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून घेणार असल्याचं म्हटलं आहे. रुईकर यांच्या कुटुंबीयाना काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसैनिक सुमंत रुईकर तिरुपतीकडे पायी जात होते. मित्रासह तिरुपती बालाजीकडे (पायी प्रवास करत निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्यानं कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी (25 डिसेंबर) दुपारी निधन झालं.रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे.त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सुमंत रूईकर यांच्या परिवाला मदत ट्विट करून मदत दिल्याची माहिती दिली आहे. सुमंत रुईकर यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना 50 हजार रुपयांची मदत पाठवत आहे तसेच आवश्यक ते सहाय्य तत्परतेने करत आहोत, असं मिलिंद नार्वेकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post