शिवसेनेचे अडसूळ त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

अडसूळ त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पारनेर नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन अडसूळ यांनी मंगळवारी रात्री १० वाजून १० मिनिटांचा मुहूर्त साधत अखेर राष्ट्रवादीचाच गमजा गळ्यात घातला !


मंगळवारी रात्री नितीन अडसूळ त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत,आपण राष्ट्रवादीसोबत काम करावे अशी प्रभागातील जनतेची इच्छा असल्याचे सांगत आपण अपक्ष असलो तरी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असल्याचे त्यांनी जाहिर केले.त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना राष्ट्रवादीचा पंचा परिधान केला.यावेळी माजी सभापती  गंगाराम बेलकर, किसन गंधाडे, डॉ.बाळासाहेब कावरे, राजू खोसे, ज्ञानेश्वर लंके,सचिन पठारे,कैलास औटी आदी उपस्थित होते.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post