पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भाजपला इतक्या रूपयांची देणगी....शहा, गडकरी, फडणवीस यांनीही
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ट्वीट  करत भारतीय जनता पक्षाला 1 हजार रुपये देणगी दिली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी देणगी नेमकी का दिली आहे, हे देखील स्पष्ट केलं आहे. ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलंय की,

राष्ट्रहित हे भाजपचं पहिलं प्राधान्य आहे. त्याच उद्देशानं भाजप पुढे वाटचाल करतो आहे. भाजपचे कार्यकर्ते हे आयुष्यभर निस्वार्थी सेवेनं आपलं योगदान देत आहेत. तुमचं एक छोटंसं दान किंवा देणगी भाजप कार्य़कर्तांच्या सेवाकार्याला बळकटी देण्याचं मोलाचं काम करु शकते. भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी तसंच देशाला भक्कम बनवण्यास भाजपाला मदत करण्यासाठी योगदान द्यावं.


या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देणगीची पावतीही पोस्ट केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमित शाह  यांनीही भाजपला देणगी दिली आहे. भाजपला देणगी देणं म्हणजे भारताला शक्तिशाली करण्यासाठी दिलेलं मोलाचं योगदान आगहे, असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. यासोबत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस यांनीही देणगी दिली असून देशाील वेगवेगळे कार्यकर्ते या देणगी अभियानाशी जोडले जात आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post