नेप्ती उपबाजारसमितीमध्ये कांदा लिलाव पुर्ववत सरु

 नेप्ती उपबाजार येथे गुरुवार दिनांक ०९/१२/२०२१ पासुन कांदा लिलाव पुर्ववत सरुनगर- अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने आडते व व्यापारी यांनी शनिवार दिनांक ४/१२/२०२१ व सोमवार दिनांक ६/१२/२०२१ रोजी मा.खा.दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार, अहमदनगरचे नेप्ती उपबाजार यार्डवरील कांद्याचे लिलाव बंद ठेवलेले होते. आज दिनांक ०७/१२/२०२१ रोजी बाजार समिती संचालक मंडळ तसेच आडते व व्यापारी यांची संयुक्त मिटींग होवून गुरुवार दिनांक ०९/१२/२०२१ पासुन कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरु करण्याबाबत निर्णय झालेला आहे. यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्री.संतोष म्हस्के व संचालक मंडळ तसेच आडते असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे व इतर व्यापारी-आडते उपस्थित होते. तरी शेतकरी बंधूनी आपला कांदा हा नियमित शेतीमाल वाळवून-सुकवून समितीमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवांना करण्यांत येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post