मनपा हद्दीतील शाळा व अंगणवाडी करता अतिरिक्त पोषक आहारासाठी निधी उपलब्ध करून दया- आ.संग्राम जगताप

 मंत्री.यशोमती ठाकूर यांच्याकडे आ.संग्राम जगताप यांचे निवेदन ; पोषक आहारासाठी निधी उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी
मनपा हद्दीतील शाळा व अंगणवाडी करता अतिरिक्त पोषक आहारासाठी निधी उपलब्ध करून दया 


महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांचे निवेदनाद्वारे मागणीअहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर महानगरपालिका महिला बालकल्याण समितीच्या वतीने 16 डिसेंबर रोजी बैठक घेऊन शहरातील शाळा व अंगणवाडी करता अतिरिक्त पोषण आहार सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.तरी शासनाने लवकरात-लवकर निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून सर्वसामान्य मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या पोषक आहाराच्या माध्यमातून आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल,यासाठी शासनाने लवकरात-लवकर या प्रस्तावाचा विचार करून मान्यता द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आज सोमवारी मुबंई येथे आमदार संग्राम जगताप यांनी मुंबई येथे महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post