रोहित पवारांच्या खेळीचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध, भाजपवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

 रोहित पवारांच्या खेळीचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध, भाजपवर उमेदवार बदलण्याची नामुष्कीअहमदनगर : कर्जत नगर पंचायत निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. अशावेळी आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदेंना पुन्हा एकदा जोरदार दणका दिलाय. रोहित पवारांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. तर तीन ठिकाणी उमेदवार बदलण्याची नामुष्की भाजपवर आलीय.कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अशावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. भाजपच्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावरुन शिंदे आणि निवडणूक अधिकारी यांच्या शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर शिंदे यांनी कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या गोधड महाराजांच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post