आमदार निलेश लंके यांना जनसेवेसाठी मंत्रीपदाची संधी द्यावी

 आमदार निलेश लंके यांना जनसेवेसाठी मंत्रीपदाची संधी द्यावी - इंजि.डी.आर.शेंडगे२०१९ पारनेर नगर मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडी कडुन विधानसभा लढविलेले उमेदवार इंजि. डी.आर.शेंडगे यांनी खासदार शरदचंद्र पवार साहेब यांचे कडे आमदार निलेश लंके यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ई- मेल पत्राद्वारे मागणी केली आहे.

आमदार लंके यांनी निवडुन आल्यानंतर जनसेवक म्हणून झोकुन जे काम सुरू केले आहे ते निश्चितच एक जनतेची तळमळ असणारे दुर्मिळ व पोटतिडकीने काम करण्याचे उत्तम उदाहरण आहे.

सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आणि क्रिडा या सर्वच क्षेत्रात झोकून देऊन काम करण्यासाठी ते सदैव तयार असतात.पारनेर मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनत आहे.सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत असतात. मतदारसंघा सहित पुर्ण राज्यभर काम करण्याची त्यांची तळमळ व नियोजन असते .ते कोरोना काळात सर्वांनीच पाहिले आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून राज्यभर जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना मंत्री पदाची संधी द्यावी अशी विनंती पत्रात केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post