नारायण राणेंची महाविकास आघाडीला धोबीपछाड....जिल्हा बँकेत भाजपचा मोठा विजय

 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपचं वर्चस्व, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पराभूत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आहेत. सावंत हे माजी अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post