ईडीकडून ९ तास चौकशी.... राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले...

 ईडीकडून ९ तास चौकशी.... राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अंमलबजावणी संचलनालय ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यावेळी तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. तसंच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असंही तनपुरे म्हणाले आहेत. मंगळवारी दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत. मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post