मोठी बातमी.. मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा डंका जनसेवा पॅनलचा दारुण केला पराभव

 मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा डंका जनसेवा पॅनलचा दारुण केला पराभव

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थावर 25 वर्ष जनसेवा पॅनलची सत्ता होती यावेळी सहकार पॅनलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल व मार्गदर्शन जितेंद्र सारसर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आज मतदान प्रक्रिया पार पडली व त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया देखील झाली या निकालामध्ये सहकार पॅनल च्या पंधरा उमेदवारांनी जनसेवा पॅनल च्या सर्व उमेदवारांना पराभूत केले व विजयाचा शिक्कामोर्तब केला विजयी उमेदवार बाबासाहेब मुदगल, विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गीते, कैलास चावरे, सतिष ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब धंगेकर या सर्व उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या  मतांनी विजय मिळवला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post